असा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजवर आपण अनेक प्रकारचे ढोकळा खाल्ले असतील. आज आम्ही आपल्याला एक नवीन प्रकारचा ढोकळा आणि त्याची रेसिपी सांगणार आहोत. ढोकळा ही गुजरातमधील पारंपरिक आणि लोकप्रिय डिश आहे. खमण ढोकळा, रवा ढोकळा, सफेद ढोकळा असे अनेक प्रकार आहेत. डाळीचा आणि तांदळाचा वापर करून हा टेस्टी ढोकळा तुम्ही बनवू शकता.

साहित्य घ्या मंडळीहो…

ढोकळा बनवण्यासाठी :-

 1. 1 कप तांदूळ
 2. 1/2 कप चणाडाळ
 3. 1/4 कप मुगदाळ
 4. 1/4 कप उडीद दाळ
 5. 2 टेबलस्पून पोहे
 6. 4 टेबलस्पून दही
 7. 1 पॉकेट इनो
 8. 1 टिस्पून साखर
 9. 1 टिस्पून तेल
 10. 1/2 टिस्पून हळद
 11. 2-3 हिरव्या मिरच्या
 12. 1 तुकडा आद्रक
 13. चवीनुसार मीठ

फोडणीसाठी :-

 1. 1 टिस्पून तेल
 2. 1/2 टिस्पून मोहरी
 3. 1/2 टिस्पून जिरे
 4. 1 टिस्पून तीळ
 5. 6-7 पाने कडीपत्ता
 6. 1 टेबलस्पून कोथिंबीर

चटणीसाठी साहित्य :-

 • 1/2 कप कोथिंबीर
 • 1/2 कप पुदिना
 • 1 तुकडा आद्रक
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 2 ढोकळे
 • 1/2 लिंबू
 • 1/2 टिस्पून साखर
 • चवीनुसार मीठ

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला

 1. प्रथम तांदूळ, पोहे, सर्व दाळी 6 – 7 तास भिजत ठेवा. पाणी निथळून घ्यावे. मिक्सरमध्ये दाळ – तांदूळ, हिरव्या मिरच्या, आद्रक, दही घाला.
 2. बारीक वाटून घ्यावे. नंतर त्या मध्ये हळद, मीठ, तेल साखर घालून मिक्स करा.
 3. कढईत पाणी घालून स्टँड ठेवा. तयार ढोकळ्याच्या मिश्रणात इनो घालून मिक्स करा. (इनो ढोकळा वाफवतानच घालावा. इनो घालायचा नसेल तर 6 -7 तास ढोकळ्याचे मिश्रण आंबवून घ्यावे.)
 4. एका प्लेटला तेल लावून त्यात हे मिश्रण पसरवून घ्यावे. नंतर कढईत ठेवून झाकून 20 मिनिटे वाफवून घ्या.
 5. फोडणीपात्रत तेल गरम करून मोहरी, जिरे, तीळ कडीपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी तयार ढोकळ्यावर पसरवून घ्या. वरतून कोथिंबीर घालावी.
 6. थोडे थंड झाल्यावर कट करून चटणी सोबत सर्व्ह करावे.

 संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here