स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल

१) अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.

२) दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.

३) चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

४) जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.

५) स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.

६) जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.

७) संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.

८) तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता.

९) वेळेचं पक्कं असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं.

१०) जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही.

संकलन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here