अरररारा खतरनाक… शाळेतले हे भन्नाट जोक वाचुन हसून हसून येडे व्हाल

१) गुरुजी: तुझा जन्म कोणत्या वारी झाला?
बंड्या :मंगळवारी,बंड्या :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला.गुरुजी :रविवारी
बंड्या :गप बसा राव मास्तर…रविवारी सुट्टी असती
२) मास्तर: सांग, ५ – ५ = कीती?.
सगळी मुले शांत…मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,तर तुझ्याकडे काय उरले?
बंड्या: सांबर अणि चटणी
३) मास्तर: सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले?
सोन्या: निल आर्मस्ट्राँग
मास्तर: अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?
सोन्या: तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
मास्तरनी खडू चाउन खाल्ला
४) सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले.
मुख्याध्यापक: काय रे सोनू मोनू तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात,मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले?
सोन्या: बस काय सर …. परत तुम्हीच म्हणाला असता…. कॉपी केली म्हणून
मुख्याध्यापक जागेवर कोसळले
५) जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटलेतर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की,
अर्धी नोकरी संपत आली पण…तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी?
६) काल बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो.सुदैवाने काही शिक्षकांची भेट झाली.
मी अतिशय नम्रपणे व दाटलेल्या कंठाने त्यांना म्हणालो…“आज मी जो काही आहे, तुमच्यामुळे आहे” लगेच दोघेजण म्हणाले …
“हे बघ, तू आम्हाला दोष देउ शकत नाही.आमच्या परीने आम्ही शक्यते सर्व प्रयत्न केले होते.
७) सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग
गुरुजी ओळखलंत का मला?
हो ओळखलं ना. १९८७ ची तुकडी ना?
…३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी ..
८) प्राध्यापक शब्द शिकवीत होते.
त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, “कविता आणि निबंध यातला फरक सांगा…”
“प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असतेआणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !”, विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.
शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेलेनसताना उत्तर बरोबर आल कस… ?
९) शिक्षक: दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.
गण्या: दहा.शिक्षक: ते कसे?
गण्या: नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.त्यांचा काय फणस होतील काय मास्तर
१०) शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?
गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.
नाहीतर Staff Room मधे जमा करणार.
नियम म्हणजे नियम

संकलन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here