‘त्या’ बुटांवरून फडणवीस झाले ट्रोल; वाचा, काय घडला प्रकार

उस्मानाबाद :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर बिहार निवडणूक प्रचारातून वेळ काढून विरोधीपक्षनेते देवेद्र फडणवीस यांनीही पूरग्रस्त भागाला भेट देत नुकसानग्रस्त लोकांची, शेतकऱ्यांची भेट घेतली.

या दरम्यान फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर आणि इतर भाजप नेत्यांचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्या फोटोत दिसत आहे की, तिन्ही नेत्यांनी एकाच प्रकारचे बूट घातलेले आहेत. यावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे. तसेच मागच्या वर्षी फडणवीस मुख्यमंत्री असताना कोल्हापूर आणि इतर भागात आलेल्या पुराची पाहणी फडणवीस आणि भाजप नेत्यांनी हेलिकॉप्टरमधून केली होती. मात्र यावर्षी पूर आल्यावर फडणवीस व भाजप नेते चिखल तुडवीत पाहणी करण्यासाठी गेले. यावरूनही फडणवीस ट्रोल झाले.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here