पवारांवर आहे ‘ती’ जबाबदारी म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा साधला शरद पवारांवर निशाणा

उस्मानाबाद :

‘कोरोनामुळे आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसं केंद्रावरही आहे. कर्ज काढलं पाहिजे ही शरद पवारांची सूचना योग्य आहे, या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे. शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु सरकारचा बचाव करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढचं ते बोलतात’, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षात मतभेद असले तरी केंद्राकडे हात दाखवण्यात एकमत आहे. जबाबदारीतून हात झटकले जातायेत, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय भाष्य कराल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मला राजकारण करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांनाही राजकारण नकोय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मुख्यमंत्र्यांनी गावात झालेली नुकसान न पाहता गावाबाहेर पुलावर भेटायला बोलावले, निधी कमी दिला. अत्यंत कमी वेळाचा दौरा होता, अशा विविध कारणांमुळे मविआ तसेच मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here