प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीवर आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद; पहा काय म्हटलेय त्यांनी

अहमदनगर:

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य  शिष्टमंडळाने रविवारी (दि. १८ ऑक्टोबर रोजी जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. कोव्हीड १९ या गंभीर आजाराचाही समावेश वैद्यकीय सूचीत  करण्यासह शिक्षकांना कॅशलेस हेल्थ कार्डचा लाभ देण्याविषयी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मकरीत्या विचार करून यावर लवकरच आदेश देण्यात येईल असे आश्वासन टोपे यांनी दिले आहे.

संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली  शिक्षकांच्या शिष्टमंडळाने टोपे यांना मागणीचे निवेदन दिले. वैद्यकीय बाबीसाठी झालेला खर्च पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे दि. ८ मार्च २०२० पासून लागू करण्याबाबत तात्काळ शासन निर्णय काढण्याची ग्वाही त्यावेळी आरोग्यमंत्री यांनी दिल्याची माहिती राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी दिली आहे.

या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष रवींद्रकुमार सोनवणे, राज्य संयुक्त चिटणीस डॉ. रवींद्र काकडे , अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे, जिल्हा संघटक महेश लोखंडे, पाथर्डी तालुकाध्यक्ष भारत शिरसाठ, तालुक सरचिटणीस राजेंद्र खंडागळे हेही होते. शिक्षकांच्या या महत्वाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासह मंत्र्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, जिल्हा नेते सर्जेराव राऊत, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, रामराव ढाकणे, राजकुमार शहाणे, उत्तम शेलार, माधव गोडे, संजय शेळके, विष्णू चौधरी, दत्तात्रय परहर, विष्णू बांगर, प्रदीप चक्रनारायण, संदीप भालेराव, रज्जाक सय्यद, संजय सोनवणे, शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे, महेश लोखंडे, पावलस गोरडे, सुधीर रणदिवे, मधुकर डहाळे, सुनिल चुंभळकर, अश्पाक शेख, बाबासाहेब डोंगरे, सुधीर शेळके, लहू फलके, रविंद्र दरेकर, सुखदेव डेंगळे, संजय मोटकर, संभाजी तुपेरे, विलास लवांडे, दिलीप दहिफळे, मुकुंद सोनवणे, रवींद्र अनाप, शिवाजी नरवडे, सुधीर बोर्‍हाडे, जनार्दन काळे, बाळासाहेब जाधव, ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, पांडुरंग देवकर, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ, राजेंद्र खंडागळे, सचिन शेरकर, प्रविण शेळके, बथूवेल हिवाळे, शहाजी जरे, संदीप कडू, दत्तात्रय काळे, दत्तात्रय बर्गे, शिवाजी माने, शहाजी शेळके, मधुकर टकले, ज्ञानदेव उगले, आदिल शेख, प्रमोद घोडके, संदीप गायकवाड, राहुल व्यवहारे, संजय कांबळे, दत्तात्रय दावभट, विशाल कुलट, विनायक गोरे, आदिनाथ पोटे, रविंद्र चंदन, मनोहर भालेराव, दिपाली बोलके, संगीता घोडके, संगीता निमसे, संगीता निगळे, मनीषा गोसावी, उज्ज्वला घोरपडे, सुरेखा बळीद, सविता नागरे, मनीषा क्षेत्रे, ज्योती करांडे, सविता तवले, प्रियंका खांदवे, शितल ससे, विनिता शिंदे, सुमन कडूस, वर्षा शिरसाठ, मेहमूदा मुजावर, सुलताना शेख, प्रतिभा देठे, सीमा गावडे या सर्वांनी शिक्षक संघ आणि मंत्री टोपे यांचे आभार मानले आहेत.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह २० विधानसभा सदस्यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या विनंतीवरुन शासनाकडे वरील मागणीबाबत शिफारस केलेली होती. या शिफारशी आणि परिपूर्ण असा प्रस्ताव संघाने मंत्री राजेश टोपे यांच्याकडे दिला. त्यांनीही या न्याय्य मागणीसाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे, अशी माहिती राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here