‘या’ समस्या असल्यास पिऊ नका हळदीचं दूध; वाचा आणि शेअर करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नाना उपाय केले जात आहेत. त्यात प्रामुख्याने हळदीचं दुध सध्या ट्रेंडमध्ये आहे. घशात खवखव, थोडासा खोकला असं काही जाणवल की हळदीच्या दुधाचे सेवन केले जाते. मात्र कधी कधी शरीराची परिस्थिती अशी असते की त्या काळात हळदीच्या दुधाचं सेवन करनं आपला त्रास वाढवू शकत.

अशा परिस्थितीत करू नये हळदीच्या दुधाचे सेवन :-

१) कफ साठून राहत असल्यास किंवा कफ बाहेर पडत नसल्यास हळदीचं दुधाचे सेवन करू नये. त्यामुळे छातीत जणपणा जाणवू शकतो.

२) श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वास घेताना छातीत दुखत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिऊ नये. 

३) हळदीमध्ये असणारे गुण इतके तिखट आणि थेट प्रभावी असल्याने ते आपल्या श्वसन संस्थेला अतिसक्रिय करतात. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.

४) श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या असल्यास किंवा पंप वापरत असल्यास चुकूनही रात्री हळदीचं दूध पिऊ नये.   

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here