मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यावरून भाजपची जळजळीत टीका; फोटोग्राफर आले आणि….

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूरचा दौरा केला. यावरून ‘फोटोग्राफर आले, स्वतःचे फोटो काढून गेले’, म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

पुढे बोलताना भातखळकर म्हणाले की, तोंडाच्या वाफा दवडण्याबद्दल एखादा जागतिक पुरस्कार असता तो महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांनाच मिळाला असता. शेतकऱ्यावर आलेली भीषण आपत्ती पाहून त्यांना मदत करण्याची दानत नाही आणि कर्तृत्वही नाही, शेतकऱ्याचे अश्रू पुसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांची सवंग टीका मात्र सुरू आहे. ‘माझे’ कुटुंब माझी जबाबदारी महाराष्ट्राची जबाबदारी मोदी बघून घेतील’, असे म्हणत पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोलाही लगावला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनीही टीका केली. यावरूनही भातखळकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींनी टीका केली. ठाकरेंना घरचा शालजोडीतला आहेर मिळाला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here