असा बनवा ‘राजस्थानी गट्टा पुलाव’; वाचा आणि ट्राय करा

राजस्थान मधले गट्टेची भाजी खूप प्रसिद्ध आहे. हा पुलाव पहिल्यांदाच खूप सुंदर चवदार आणि झणझणीत असा हा पुलाव चवीला लागतो. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. बेसनाचे गट्टे, मसाल्याचा सुगंध आणि भरपूर काजू किस्मिस यांचा फ्लेवर हा सर्वांना आवडणारा पुलाव आहे.

साहित्य घ्या मंडळीहो…

गट्टा बनविण्यासाठी लागणारे साहित्य..

 1. १०० ग्रॅम बेसन (१ कप)
 2. 2-3 टेबलस्पून दही
 3. चवीनुसार मीठ
 4. 1 टेबलस्पून तिखट
 5. 1/2 टिस्पुन हळद
 6. 1/2 टिस्पुन ओवा
 7. 2 टेबलस्पून तेल
 8. २५० ग्रॅम बासमती तांदुळ (२ कप)

पुलाव बनविण्यासाठी लागणारे साहित्य..

 • 2-3 टेबलस्पून तूप
 • 1 टमाटर
 • १ टेबलस्पून गरम मसाला
 • 1/2 टिस्पुन जिरे, मोहरी, हळद
 • 4-5 लंवग
 • 7-8 हिरव्या मिरच्या
 • ८-१० मीरे
 • 2 मोठी विलायची
 • 1-2 टेबलस्पून अदरक लसूण पेस्ट
 • 1 छोटा तुकडा दालचिनी
 • चवीनुसार मीठ
 • 2-3 तेजपान
 • 1-2 टेबलस्पून कोथिंबीर थोडीशी
 • 10 ग्रॅम काजू, किसमिस

साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला

तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. अर्धा तास पाण्यात भिजत घालून, नंतर पाण्यातून काढून चाळणीत काढून ठेवा. एक पॅन घ्या. त्यात तेल किंवा तूप घाला. तेल गरम झाले की त्यात, तेज पान, मोठी विलायची, दालचिनी, मिरे घालून थोडे परतून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून, तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून भात तयार करून घ्या.

बेसनात वरील सर्व मसाले, दही आणि तेल टाकून, हाताने चांगले मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून कणीक जशी मळतो, त्या प्रकारे नरम गोळा तयार करा.

भिजवलेल्या गोळ्याचे चार भाग करून, 1/2 इंच मोठे रोल तयार करून घ्या.

एका भांड्यात पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. त्यात आता हे बेसनाचे रोल टाकून 10 ते 12 मिनिटे गॅस वर मध्यम आचेवर होऊ द्या. रोल झाले की ते वरती पाण्यावर येतात. तेव्हा गॅस बंद करा व पाण्यातून हे रोल काढून, प्लेटमध्ये काढून घ्या व थंड होण्यासाठी ठेवून द्या.

रोल थंड झाल्यावर चाकूने १ सेंटीमीटर चे मोठ्या तुकड्यांमध्ये गट्टेयाचे काप करून घ्या. (फोटोत दाखवीले तसे) कढई मध्ये तेल घालून, गोल्डन कलर येईस्तोवर गट्टे तळून घ्या. आपले बेसनाचे गट्टे तयार..

एक कढई घ्या. त्यात तेल किंवा तूप घाला. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जीरा घाला. मोहरी, जिरे तडतडले की त्यात कांदा, लसूनअदरक ची पेस्ट, हिरवी मिरची घालून एक मिनिटे परतून घ्या.नंतर यामध्ये काजु किसमिस घालून दोन मिनिटे होऊ द्या.

आता यामध्ये तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, टमाटर मिरचीची पेस्ट घालून एक मिनिट वाफेवर शिजवून घ्या. नंतर यात तळलेले गट्टे घाला व छान मिक्स करून घ्या.

आता यामध्ये शिजवलेला भात घाला. चांगले मिक्स करून, दोन मिनिट वाफ काढून घ्या.वरून २ टेबलस्पून तूप घाला व कोथिंबीर घालून, दही रायता सोबत गरमागरम सर्व्ह करा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here