‘घटने’ बद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंचे स्पष्टीकरण; म्हणाले..

मुंबई :

‘मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसईबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल’, असे विधान खासदार संभाजीराजे यांनी केले. त्यानंतर या वक्तव्यावरून समाजाच्या विविध स्तरांमध्ये त्याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्या आहे’ असे संभाजीराजेंनी म्हटले. तसेच, मला घटनादुरुस्ती असे म्हणायचे होते, असेही स्पष्टीकरण त्यांनी पुढे बोलताना दिले.

संभाजीराजें म्हणाले की, पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारले होते. मात्र, मला तसं म्हणायचं नव्हत. मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा बातम्या दिसत आहेत, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे, मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना दुरुस्ती ऐवजी बदला हा शब्द निघाला असावा, पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे, लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.

नेमकं काय म्हणाले होते संभाजीराजे :-

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसईबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे, त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल.

संपादन :स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here