‘या’ कंपनीचा मोठा धमाका; ’अवघ्या’ ३ हजारात देणार ५ जी स्मार्टफोन

मुंबई :

मोबाईल क्षेत्रात सध्या मोठ्या आघाडीवर असणारी जिओ कंपनी नेहमीच ग्राहकांची मागणी पाहून अगदी कमी दारात उत्पादने आणत असते. आता जिओ अजून एक नवा धमाका करायला तयार झाली आहे. रिलायंस जिओ कमी किमतीत ५ जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. जशी फोनची मागणी वाढेल तसा हा फोन २५०० ते ३ हजार रुपयात युजर्स साठी उपलब्ध केला जाणार असल्याचेही समजते. 

मोठमोठे धमाके करून विक्रम गाजवत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवण्याचे कसब सध्या फक्त जिओकडे उपलब्ध आहे. सध्या आर्थिक जगताची अवस्था खालावलेली आहे. अशातच टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या विविध ऑफर्स देऊन आपल्या ग्राहकांना जोडून ठेवत आहेत. या सगळ्या परिस्थितीतही जिओने मोठा धमाका करत नवा आणि स्वस्तात मस्त असलेला मोबाइल आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे.

भारतीय बाजारात सध्या २७ हजार रुपयापासून ५ जी स्मार्टफोन मिळतात. भारतीय बाजारात पहिला फोर जी फोन रिलायंस जिओने लाँच केला होता. जिओ फोन नावाने बाजारात आलेला हा फोन १५०० रुपये रीफंडेबल डीपॉझीट देणाऱ्या ग्राहकांना मोफत दिला जात होता. कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ३३,७३७ कोटी घेऊन जिओ मधला ७.७ टक्के हिस्सा गुगल ला विकण्यात आल्याची घोषणा केली होती. त्याचवेळी भारताला टूजी मधून मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here