शेतकऱ्यांची चिंता वाढली; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज तर मराठवाड्यासह बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान तर झालेच आहे. तसेच जीवितहानीही झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here