ब्रेकिंग : अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी आणले आहे. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

यानंतर अमित यांच्या मलेरिया आणि ईतरही चाचण्या करण्यात आल्या. मात्र याही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान सध्या त्यांना २ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल फ्लू असावा, असा अंदाज लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितला आहे. कोरोनाच्या स्थितीत खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांना पुढील एक दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, अशीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचेही सांगितले जात आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here