पैसा एक पण नावे अनेक; वाचा पैशाविषयीचा हा सुंदर लेख

१) लग्नकार्यात दिले तर त्याला “आहेर” म्हणतात.

२) शाळेत दिले तर त्याला “फी” म्हणतात.

३) लग्नात दिले तर त्याला “हुंडा” म्हणतात.

४) घटस्फोटात दिले तर त्याला “पोटगी” म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले तर त्याला “उसने दिले” म्हणतात.

६) शासनास दिले तर त्याला “कर” म्हणतात.

७) न्यायालयात दिले तर त्याला “दंड” म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला “पेंशन” म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला “पगार” म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले तर त्याला “बोनस” म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास त्याला “कर्ज” म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना त्यास “हप्ता” म्हणतात.

१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला “टिप” म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास त्याला “खंडणी” म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास त्याला “लाच” म्हणतात.

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास त्याला “भाडे” म्हणतात.

१७) सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास “देणगी” म्हणतात.

आता प्रश्न असा आहे की “पतीने पत्नीस” पैसे दिल्यास त्याला काय म्हणावे ?

सोप आहे एवढही माहीत नाही का ?

त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.                    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here