प्रत्येक इंजीनियरने वाचावा असा लेख ‘इंजीनियर सम्राट’…. असा इंजीनियर होणे नाही !

इंजीनियरिंग सम्राट….
असा इंजीनियर होणे नाही….टू स्टडी ऑर नॉट टू स्टडी दॅट इज द क्वेशचन.अभ्यास करावा की न करावा
हा एकच सवाल आहे.या इंजीनियरिंगच्या उकिरड्यावर
चाळीसवर विषय काढत जगावं बेशरम लाचार आनंदानं…. की फेकुन द्यावं बॅकलॉगच्या विषयाचं दप्तर त्यात गुंडाळलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांसह रिझल्टच्या काळ्याशार डोहामध्ये….आणि करावा सर्वांचा शेवट एका इयर ड्रॉप ने.माझा , तुझा , याचा आणि त्याचाही….SOM , TOM , DOM , M2 , M3 च्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की
नंतर येणाऱ्या रिझल्टला नसावा जागृतीचा किनारा कधीही….पण त्यात नव्या ऑल क्लियरच्या रिझल्टची पुन्हा स्वप्न पडू लागली तर ?तरतरतरतर इथचं मेख आहे.नव्या विषयांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो तेच जुने बॅकलॉगपण ,सहन करतो एका बॅकलॉग नंतर येणारा पुढचा बॅकलॉग.इंजीनियरच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार.अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची विटंबना.आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन
उभा राहतो हा इंजिनीअर ,खालच्या मानेने एक्सटरनल नावाच्या रक्षसा समोर ओरलच्या चौकशी दाराशी….विधात्या ,तू इतका कठोर का झालास ?एका बाजूला ,
आम्ही ज्या इंटर्नलला मान दिला तो आम्हाला विसरतो.आणि दुसऱ्या बाजूला बाहेरून आलेला तो एक्सटर्नल दूजा भाव करतो….मग राहिलेल्या बॅकलॉगचे हे गाठोडे घेऊन
हे करुणाकरा ,आम्ही इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच….??कोणाच्या पायावर ??कोणाच्या ??कुणी विषय काढून देत का….??
विषय….चाळीसवर..

प्रत्येक इंजीनियरपर्यंत हा लेख पोहोचवा….

संकलन : विनोदकुमार सूर्यवंशी (थर्ड यीअर इंजिनियर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here