हे अशक्य पांचट जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

१)     संता, बंता आणि गुरमीत तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेत.

अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते.
तो वैतागून शिट्टी वाजवतो.

बंता त्याला सांगतो. अरे वेडाच आहेस.
आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार?

२)     एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,

जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा ,
बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि तिथे लिहुन ठेवलेले असते”

तुझा पोपट झालाय , चल फूट इथून “
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो “मी आलोच नव्हतो “

३)     काल मला १० जणांनी खूप मारला..

संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..

संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एके ऐकाने येऊन परत मारलं..

४)     संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.

कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.

एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते. एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.

यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, माणूस पाण्यात विरघळतो.

५)     संता : बंता, इतर लोकांना जमत नाही.
पण, फक्त तुलाच जमते अशी एखादी गोष्ट सांग.

बंता : सोपे आहे.

संता : सोपे आहे? तर सांग ना.

बंता : मी लिहिलेलं हस्ताक्षर केवळ मी आणि मीच वाचू शकतो.

६)     संताची जाम गोची झाली होती.
त्याला त्याच्या बायकोचं म्हणणं नीट ऐकूच येईना झालं होतं.

त्याची बायको तर त्याच्यावर वैतागायची.
याच वैतागाने संताने तडक दवाखाना गाठला.

संता : डॉक्टर, अहो माझ्या कानाचं काहीतरी करा.
मला आजार झालाय. अहो, बायकोचं म्हणणं मला ऐकूच येत नाहीये.

डॉक्टर : संताजी, अहो हा आजार नाही, तुमच्यावर देवाने कृपा केली आहे

७)     संता: काय झाले का रडत आहेस?

बंता: हत्ती मेला.
संता: तो तुझा पाळीव हत्ती होता का?

बंता: नाही
संता: मग तू का रडत आहेस?

बंता: कारण मला त्याच्यासाठी कब्र खोदायचे काम दिले गेले आहे.

८)     एका रात्री संताच्या बायकोची दाढ दुखत होती. बिचारी रडत होती.

संता: जर ही माझी दाढ असती तर मी केव्हाच तीला ओढून काढले असते.

बायको: जर ही तुझी दाढ असती तर मी पण तिला केव्हाच ओढून काढली असती.

९)     संता दारू पिऊन घरी गेला
आणि बायकोच्या रागा पासून वाचण्यासाठी पुस्तक उघडून वाचण्याचे नाटक करू लागला.

बायको: आज तू परत दारू पिऊन आलास का?
संता: नाही अजिबात नाही.

बायको: तर मग ही सुटकेस उघडून काय करतोय.

१०) संत्या रिक्षावाल्याला म्हणाला,
“सदाशिव पेठेत येतोस का?”
रिक्षावाला म्हणाला, “चाळीस रुपये होतील.”
संत्या म्हणाला, “दहा रुपये देतो.” …
…रिक्षावाला म्हणाला, “दहा रुपयात कोण नेईल?”
संत्या म्हणाला, “मागे बस. मी नेतो!!

संकलन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here