हे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आयुष्यात होईल सकारात्मक बदल

 • “जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”
  • जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का?  
  • “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
  • आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका
   कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात.
  • दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही,जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.
  • आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
   शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं.. कधीही चांगलं.
  • टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात.
  • जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल  ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.
  • नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते.
  • ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला! कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !!
 • संकलन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here