पुण्यावर पावसाचं मोठं संकट, ‘इतक्या’ दिवसांसाठी ‘अलर्ट’; राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

पुणे : 

परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानाने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काहि ठिकाणी पूर आला आहे तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. पावसामुळे राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असले तरी शहरातही आता पावसाचा धोका वाढतो आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाला. पुण्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस चालू आहे. पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here