सोन्याच्या किमतीही घसरल्या, पेट्रोल-डिझेलबाबतही सामान्यांना दिलासा; वाचा काय आहेत इंधनाचे दर

मुंबई :

कोरोनामुळे जगभरात आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शेअर मार्केट, सोने, इंधनांचे दर कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. एकूणच काय तर आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किमतीही घसरत आहेत तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही स्थिरावले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह आज अनेक महानगरांमध्ये इंधनांच्या भावांत कोणतेही बदल झाले नाहीत. 

1 लीटर पेट्रोलचे भाव :-

दिल्ली – 81.06
मुंबई – 87.74
चेन्नई – 84.14
कोलकाता – 82.59
नोएडा – 81.58

पुढच्या महिन्यात 7 प्रमुख शेल फॉर्मेशन्समध्ये तेलाच्या उत्पादनात 1,21,000 बॅरल कपात होईल. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहेत, असे अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एईआय) च्या अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत बाजारात सध्या पेट्रोकेमिकल्सच्या किंमतीवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळत नाही.

गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सोन्याचे भावही उतरलेले आहेत. सध्या सोन्याचे दर प्रती तोळा ५० हजाराच्या आसपास आहेत. हे दर कमी जास्त होत आहेत, मात्र त्यात लक्षणीय बदल दिसत नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here