नाईट शिफ्ट करताय; भोगावे लागतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणी नाईट शिफ्ट करावी लागते. एमआयडीसी, माध्यम, सुरक्षारक्षक अशा कितीतरी क्षेत्रातील लोकांना नाईट शिफ्ट असते. दिवसभर झोपायचे आणि रात्रीचे काम करायचे. एकूणच काय तर मानवी जीवनाच्या अगदी विरुद्ध कृती करावी लागते. त्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणामही होतात. आपल्यापैकी कित्येकांना जाणीवही नसेल की नाईट शिफ्ट आपल्या आयुष्याला किती धोकादायक आहे.

नाईट शिफ्ट करण्याचे हे आहेत तोटे :-

१) रक्तवाहिन्यांमध्ये दबाव वाढतो. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. एमआयडीसी क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असतो.

२) आतड्याचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो.

३) नाईट शिफ्ट करणारे कार्बोहायड्रेट असणाऱ्या गोष्टी खात राहतात… त्यामुळे त्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेही डायबेटिजचा धोका वाढतो. 

४) नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मुख्य तक्रारींमध्ये एक तक्रार प्रामुख्यानं आढळते… ते म्हणजे झोप पूर्ण न होणं… किंवा झोप न लागणं… अशी लोक नेहमीच थकलेले दिसतात. 

५) अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्याची शरीराची ताकद हळू हळू क्षीण होऊ लागते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here