कोथिंबीर आरोग्यासाठी आहे ‘इतकी’ लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण असे कितीतरी पदार्थ खात असतो ज्याचे फायदे किंवा उपयोग आपल्याला माहिती नसतात. आता कोथिंबीरीचेच घ्या ना … आपल्यापैकी कितीतरी लोकांना कोथिंबीर खाण्याचे फायदे माहिती नसतील. म्हणूनच आज आम्ही आपल्याला कोथिंबीरचे सेवन करणे आरोग्यास कसे लाभदायी आहे, याविषयी सांगणार आहोत.    

  • १) कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो. 
  • २) टायफाइड झाल्यास कोथिंबर खाल्यानं फायदा होतो. कोरडे धणे पाण्यात उकळून पाणी गाळून थंड करावं. ते पाणी पिल्यानं कॉलेस्ट्रालची लेव्हल कमी करता येते. 
  • ३) कोथिंबीरीचा एक चमचा ज्यूसमध्ये थोडी हळद टाकून मुरूमांवर लावल्यास ते बरे होतात.
  • ४) कोथिंबीर, हिरवी मिर्ची, किसलेलं खोबरं आणि आलं घालून चटणी खाल्लानं अपचनामुळं होणारी पोटदुखीत आराम मिळतो. 
  • ५) आरोग्य तज्ज्ञांच्या मतेही थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोथिंबीरीचा वापर आरोग्यदायी ठरतो. 

संपादन : संचिता कदम

  •  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here