असे बनवा ‘तडका सांबर आणि ज्वारी इडली’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आपल्या भारतात जरी विविध भाषा, पोशाख, आणि काही परंपरा, खाद्य पद्धतीत फरक जाणवत असला तरी ; कुठे ना कुठे समानता दिसूनच येते. जास्तीत जास्त खाद्य संस्कृतीत बरीच समानता आहे. फरक असतो तो थोडाफार मसाल्याचा उपयोग, किंवा एकाच रेसिपीला प्रांतानुसार वेगवेगळी नावे, थोडीफार बनविण्याची प्रक्रिया. अशी आजची माझी रेसिपी.. साऊथ इंडियन सांबारला आपला मराठी टच देण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे ज्वारीची पिठाची भाकरी ही महाराष्ट्राची ओळख. त्याच पिठाला इडलीच्या रूपात सजवून तुमच्या समोर प्रस्तुत केली आहे.

साहित्य घ्या मंडळीहो….

सांबरसाठी :-

 1. 100 ग्राम तुरुची डाळ (शिजवुन घेतलेली)
 2. 1 बटाटा
 3. 1 गाजर
 4. 1/4 कप लाल भोपळा
 5. 1/4 कप दोडका
 6. 1 कांदा
 7. 1 छोटा टोमॅटो
 8. चवीनुसार मीठ
 9. 1 टेबलस्पून आलं लसूण मिर्ची पेस्ट
 10. 1/2 टीस्पून जिरं
 11. 1/2 टीस्पून मोहरी
 12. 1 टेबलस्पून गूळ
 13. 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ
 14. 1टेबलस्पून सांबर मसाला
 15. 1/2टेबलस्पून लाल तिखट
 16. 1/4 टीस्पून हिंग
 17. 5-6 कडीपत्त्याची पान
 18. कोथिंबीर

इडलीसाठी :-

 1. 1 कप ज्वारीचे पीठ
 2. 1 कप रवा
 3. 1/2 कप दही
 4. चवीनुसार मीठ
 5. 1/4 टीस्पून हळद

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… लागा की बनवायला…

प्रथम सर्व भाज्या चिरून घेतल्या. एका कढईत तडक्यासाठी तेल घातले. तेल गरम झाले की, मोहरी, जिरं, हिंगची फोडणी केली. त्यात कांदा कडीपत्ता घालून परतून घ्या. आणि मिर्ची लसूण आद्रक पेस्ट घालून परतून घ्या.

आता सर्व भाज्या घालून मिक्स करा आणि झाकण ठेऊन एक वाफ काडून घ्या. नंतर गूळ आणि चिंचेचा कोळ घाला ; शिजवलेली डाळ घालून ढवळून घ्या. एक उकळी आली की 5मिनिट झाकण ठेऊन मंद गॅस वर 5मिनिट होऊ दया.5 मिनिटांनी लाल तिखट आणि सांबर मसाला घालून उकळी काढून घ्या. गॅस बंद करा वरून कोथिंबीर घाला. सांबर तयार.

एका बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ, दही, रवा, मीठ आणि गरजे नुसार पाणी घालून मिक्स करून घ्या. आणि 15 मिनिट झाकून ठेवा.

इडली बेटर पेक्षा थोडस घट्ट असुद्या बेटर. 15मिनिटांनी हळद घालून मिक्स करा. इडली च्या साच्याला तेल लावून बेटर त्यात इडली प्रमाणे घाला आणि स्टीम करून घ्या. स्टीम करून झाल्याकी थंड झाल्यास इडल्या काढून घ्या.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here