असे बनवा ‘गावठी कोंबडी-वडे’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

चिकन म्हणजे नॉनव्हेजप्रेमींचा आवडतं विषय. चिकनचे नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल म्हणून आज आम्ही चिकनचा एका भन्नाट पदार्थ आपल्या भेटीस घेउन आलो आहोत. ‘गावठी कोंबडी-वडे’ पाहाताच तोंडाला पाणी सुटले असेल…

‘गावठी कोंबडी-वडे’ बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो….

 1. 1/2 के. जी गावठी कोंबडी
 • 4 कांदे
 • १०-१५ लसूण पाकळ्या
 • 2 वाटया खोबरे किसून
 • 3-4 तुकडे आले
 • 2-3 इंच दालचिनी
 • 2 टेबलस्पून जिरे
 • 3 पाने तमालपत्र
 • 4 टेबलस्पून कोंबडी चिकन मसाला
 • 1 टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट
 • 2 टेबलस्पून धने,-जिरे पूड
 • 1/2 टेबलस्पून गरम मसाला
 • 1 टेबलस्पून हळद
 • ५-७ टेबलस्पून तेल
 • 2 टेबलस्पून साजूक तूप
 • मीठ चवीप्रमाणे
 • 1/4 वाटी कोथिंबीर
 • 1 टेबलस्पून लिंबूरस
 1. कोंबडी-वडे_. –साहित्य
 • 1कि. धूवून तांदूळ
 • 1/4कि. उडीद डाळ
 • 2 टेबलस्पून बडीशोप
 • 4 टेबलस्पून धने
 • 2 टेब स्पून जिरे
 • सर्व जिन्नस एकत्र करुन दळणे

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… लागा की बनवायला…

सर्वप्रथम साहित्य ताटात काढून कांदा कापून घ्या खोबरे किसून घ्या. खोबरे+कांदा+,भाजून घ्यावे, त्यात जिरे, दालचिनी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. कोथिंबीर,आले, लसूण एकत्र करून पेस्ट करून घ्यावी.

आता चिकनला हिरवे वाटण, तिखट हळद मीठ, लिंबूरस घालून एकजीव करा. मॅरीनेट करून १ तासासाठी ठेवून द्या.

आता कढईत तेल, तूप घालून त्यात तमालपत्र घालून चांगले परतावे. नंतर त्यात कांदा खमंग भाजून झाल्यावर त्यात हिरवे वाटण घालून हळद, तिखट, मीठ घालून झाकण ठेवून वाफ काढावी. आता कांदा खोबर्याचे वाटण घालून एकजीव करून त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून, धने जिरे पूड घालून घ्या. चिकन मसाला घालून घ्या. गरम पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे. अर्धा तासानंतर चिकन तयार

शिजल्यानंतरचे चिकनवडे करण्यासाठी वरील साहित्य घेऊन घर घंटेवर दळून आणा. त्या पिठात, तेल, मीठ घालून मिक्स करून घ्या. छोटे गोळे करून मंद आचेवर तळून घ्यावे.चिकन बरोबर वडे खाण्याची पद्धत कोकणात आहे. गौरी सणात पाहूणचार करण्यासाठी हा पदार्थ करतात.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here