‘या’ दिवशी जिम होणार सुरू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई :

टप्प्याटप्प्याने राज्य अनलॉक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून जिम बंद होत्या. हजारो जिममालक, प्रशिक्षक आणि फिटनेसप्रेमी तरुणांचा प्रश्न अनेक आंदोलने आणि मोर्चांनंतर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास परवानगी असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठ्या शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे.   

जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ‘स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंदच राहणार आहेत’, असेही स्पष्ट करण्यात आले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here