अहमदनगर :
राज्यात जरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असली तरी स्थानिक राजकारण वेगळ्याच समीकरणावर चालत असते. नगर जिल्हा हा वेळोवेळी स्थानिक राजकारण चव्हाट्यावर आणत राज्यस्तरीय पक्षनेत्यांना तोंडावर पाडत असतो. पारनेर शिवसेना नगरसेवक प्रकरण अजूनही ताजे असताना एक नवे प्रकरण समोर आले आहे. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासोबत नगर शहराचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी दगा-फटक्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावरून किरण काळे यांनी राष्ट्रवादीचा गुंड आमदार संग्राम अरुण जगताप याच्या दहशतीपुढे कॉंग्रेस कदापि झुकणार नाही, असे म्हणत हल्लाबोल केला.
नेमका काय घडला प्रकार :-
काळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह नगर शहर पक्ष कार्यालयातून बाहेर पडले असता एका इसमाने येऊन त्यांना अचानकपणे शिवीगाळ सुरु केली. ‘आमच्या संग्राम भैय्याला नडतो का? थांब, तुझ्याकडे पाहतो आता आणि तुझा कार्यक्रमच लावतो’, असे म्हणत धमकावले. तेवढ्यातच काही अजून गुंड तेथे आले. यात अंकुश मोहिते जो जगतापांचा कार्यकर्ता आहे. तोही होता. आजवर त्याने अनेक व्यापाऱ्यांना छळले असल्याचेही काळे यांनी सांगितले.
या घटनेनंतर पुन्हा दमबाजी करण्याचे काम केले तर मी त्याचा कडवा प्रतिकार करेल असेल त्यांनी सांगितले. काळे हे मंत्री बाळसाहेब थोरात तसेच युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय समजले जातात.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- सावधान… राज्यातील ‘या’ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा फैलाव; करणार ‘एवढ्या’ कोंबड्या नष्ट
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव