‘या’ कंपनीच्या अनेक कारवर मिळतोय फेस्टिवल डिस्काउंट; ६५ हजारांपर्यंत करा बचत

मुंबई :

आता सणावारांचा सीजन चालू झाला आहे. विविध वस्तू, उत्पादनांची सेवा देणाऱ्या कंपन्या मोठमोठे डिस्काउंट देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्याचा उत्तम कालावधी आहे. कार क्षेत्रातही टाटानेही मोठमोठे फेस्टिवल डिस्काउंट दिले आहेत. टाटा मोटर्सची कार खरेदी करायचा विचार डोक्यात असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. टाटा मोटर्स आपल्या अनेक कारवर ६५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. टाटा कंपनीने आपल्या अनेक मॉडल्सवर डिस्काउंट ऑफर दिलेली आहे.

टाटा टियागो या कारवर ३० हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर आहे. कारवर १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.

टाटा नेक्सॉनवर कंपनी एकूण २५ हजारांचा डिस्काउंट ऑफर करीत आहे. कारवर ५ हजारांचा कॅश डिस्काउंट, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. तसेच प्रचंड प्रसिद्ध असलेली आणि ग्राहकांचे आकर्षण असलेली टाटा हॅरियर या फ्लॅगशीप मॉडलवर ६५ हजारांचा डिस्काउंट आहे. कारवर २५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. टाटा टिगोर वरही ४० हजार रुपये एकूण ४० हजारांचा डिस्काउंट आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here