मुंबई :
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावात नुकसानीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील.
पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची मागणी केली. राज्यातील शेतकरी पिचला असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत केली नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर लोकप्रतिनिधीच त्याला जबाबदार असतील, असे म्हणत त्यांनी लोकप्रतिनिधींना सुनावले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरे करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर महाविकास आघाडीचे नेतेही दौरे करत आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारपासून नुकसान पाहणी दौरा करणार आहेत.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट