अजित पवार सामना वाचत नसावेत म्हणत ‘या’ भाजप नेत्याने केली खोचक टिका

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यानंतर त्यांनी पूरग्रस्तांना आताच मदत करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र ‘पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या’ असे आदेश दिले होते. याविषयीची बातमी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात छापून आली होती. याच पार्श्वभूमीवर ‘अजित पवार सामना वाचत नसावेत’, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

भातखळकर म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी ‘सामना’तून जारी केला होता. परंतु अजित पवार सामना वाचत नसावेत. मदत देणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडे फक्त मंत्र्यांचे चोचले पुरवण्यासाठी आणि PR कंपन्यांसाठी पैसा असावा. पुढे बोलताना त्यांनी ‘फुका तोंडाच्या वाफा’, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारलाही डिवचले.

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here