मुंबई :
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी, शेतकऱ्याला आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांना भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारले. यावेळी अजितदादांनी चक्क हात जोडून पत्रकारांना नमस्कार करत नेहमीप्रमाणे आपणास याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
दरम्यान खडसे यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित झाला असला तरी अद्याप त्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यापूर्वी २ वेळा पक्षप्रवेश होणार अशा वावड्या उठल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्या पेजेसवरूनही एकनाथ खडसेंचे स्वागत केल्याच्या पोस्ट दिसत आहेत.
याविषयी खडसेंनी स्वतः मात्र काहीही सांगितलेलं नाही. मात्र नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घटली. रावेर येथील विश्रामगृहात देशमुख आणि खडसे यांची भेट झाली. कोणत्या कारणसाठी ही भेट झाली, याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे विश्रामगृहावरून एकाच गाडीने घटनास्थळी निघाल्यामुळे पुन्हा एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत तर्क-वितर्क सुरु झाले होते.
संपादन : स्वप्नील पवार
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट