जलसिंचन घोटाळा चौकशी : ‘ईडी’ने सक्रीय होत उचलले ‘हे’ पाऊल; अजित पवारांच्या डोकेदुखीत वाढ

मुंबई :

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामावर कॅगने ताशेरे ओढले. नंतर या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्यसरकारमार्फत देण्यात आले. यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या अडचणीत आलेले आहेत. अशातच सिंचन घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून होणार आहे. या घोटाळ्याचे नाव समोर येताच अजित पवारांभोवती संशयाचा भवरा फिरतो. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी व्यवहाराच्या सर्व कागदपत्रांची मागणी पाटबंधारे विभाग व संबंधित महामंडळाकडे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सहकारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजाराच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांना दिलासा मिळाला होता. परंतु आता सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार असल्याने पहिल्यापासून या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. १९९९ ते २०११ या कालावधीत राज्यात राबविल्या गेलेल्या सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याची तक्रार विरोधी पक्षाने केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यांच्या आदेशानंतर एसआयटी नेमून तपास करण्यात आला. त्यांनी क्लीन चिट दिली. मात्र आता या प्रकरणात ईडी तपास करणार आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here