‘राजे पुन्हा जन्माला या’ अशी हाक दिल्यावर छत्रपती महाराज विचारतील हे प्रश्न; वाचा ही अंगांवर शहारे आणणारी जबरदस्त कविता

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, आम्हा बरोबर शंभू देवाची शपथ पुन्हा घ्याल का ? !!१ !!

रयतेच्या कल्याणासाठी जीवाचे रान कराल का ?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,९२-९६ चा भेद विसराल का? !!२ !!

महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकीची वज्रमुठ कराल का?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,शीर हातावर गेऊन लढाल का? !!३!!

स्वराज्याची धगधगती मशाल हाती घेऊन प्राणांची आहुती द्याल का?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,शिबीच्या झाडातील तलवारी बाहेर काढाल का ?!!४ !!

स्वकीय व परकीय गद्दारांची मुंडकी तुम्ही कलम कराल का ?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,स्वाभिमान तुमचा जागवल का? !!५!!

दिल्ली च्या तख्त पुढे ताठ मानेने उभे राहाल का ?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,गनिमीकावा तुम्ही शिकाल का? !!६!!

शत्रूवर तुटून पडण्याचा पराक्रम पुन्हा तुम्ही गाजवल का?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,,लाचारीचे जगणे सोडून द्याल का? !!७!!

अन्न्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे धाडस तुम्ही दाखवल का?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, मदतीचा हाथ आम्हला द्याल का? !!८!!

गतःजन्मी सारखी साथ ह्या जन्मी तुमच्या लाडक्या छत्रपतिना द्याल का?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,दिलेला शब्द जीवापाड पळाल का ? !!९!!

तरच आम्ही जिजाऊ न विचारू “माते पुन्हा तुमच्या पोटी ह्या शिवबाला जन्म द्याल का ” ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here