का होतोय हा फोटो व्हायरल; नक्कीच वाचा ‘या’ फोटोमागची पॉजीटिव्ह गोष्ट

कोरोनाकाळात मास्क ही आपली अत्यंत महत्वाची गरज बनलेली आहे. एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाने डॉक्टरांचा मास्क ओढून काढला आहे. यामागे एका दिलासादायक गोष्ट आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली ही गोष्ट आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

दुबईमध्ये स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करत असलेल्या डॉ. समेर चैब यांनी हा हवाहवासा आणि मनामध्ये आशेचे अनेक दिवे लावणारा सुंदर फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.जन्माला आलेलं एक गोजिरं बाळ आपल्या नाजूक आणि तरीही कणखर मुठीत जन्म देणाऱ्या डॉक्टरच्या चेहर्‍यावरचा मास्क ओढून काढत आहे असं हे चित्र…!

हे बाळ जणू तुम्हाला आणि मला मास्कशिवाय हवं असणाऱ्या जगाला साद घालत आहे….!हा इवलासा जीव की आभाळीच्या बापाचा संदेश घेऊन येणारा नवा प्रेषित …आपल्याला साऱ्यांनाच मास्क काढून पुन्हा एकदा खोलवर श्वास घ्यायचा आहे…परस्परां मधल्या फुटपट्टया फेकून देऊनसगळ्यांची गळाभेट घ्यायची आहे…या साऱ्या भविष्याचे सूचन तर हा लहानगा जीव करत नाही ना ? … अजून करोना अवतीभवती वावरतोच आहे तोवर काळजी तर घ्यावीच लागेल पण नुकत्याच जन्माला आलेल्या या बाळमुठीनी नव्या स्वप्नांचे फुलपाखरु आपल्या अंगणात हलकेच सोडले आहे….सो फ्रेंड्स… काळजी घेतच राहू पण अशी सुंदर स्वप्नेही पाहत राहू…आज ना उद्या ती खरी होणारच आहेत …!

डॉ. समेर यांनी सांगितले की, विज्ञानावर आपण विश्वास ठेवत असलो तरीही या बाळाने अशा पद्धतीने मास्क ओढून काढणे म्हणजे हा एक दैवी संकेत आहे की आता कोरोना नष्ट होणार आहे. आपल्याला मास्कची गरज भासणार नाही.

संकलन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here