हे अतरंगी जोक्स वाचून आवरणार नाही हसू, हसा चकटफू

 • १) भिकारी: साहेब २० रुपये द्या ना, चहा प्यायचा आहे.

  गंपू: काय रे, चहा तर दहा रुपयांना मिळतो.

  भिकारी: साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय ना.

  गंपू: अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय.

  भिकारी: नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय.
 • २) एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली….

  एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला…

  भिकारी: डार्लिंग

  मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ??

  भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस..
 • ३) दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.

  बाबा- “वेटर एक बियर और एक आईसक्रीम लाओ!!”

  मुलगा – “आईसक्रीम का बाबा..??
  तुम्ही पण बियर घ्या ना..”

  बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?
 • ४) मुंबई पोलिस हवालदार

  पावती बनाना पड़ेगा रे बाबा…तुझं नाव काय??
  What Name…?

  फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz…

  हवालदार : दुसरी बार संभालनेका हा…। जाओ अभी… !!!

  हसू नकोस., तुला तरी वाचता आलं का?
  चल, जाऊ दे
 • ५) हवालदार: बाई, तुमची कमाल आहे.
  न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारलीत.!!!!!……..

  बाई: तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं,
  मला वाटलं आमचे हेच आहेत.
 • ६) पोलीस: काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
  बेवडा: प्रवचन ऐकायला!

  पोलीस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
  बेवडा: दारू पासून होणारे दुष्परिणाम,

  पोलीस: एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
  बेवडा: माझी बायको !!
 • ७) मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत
  पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात.

  ‘उभं रहा आणि जरा बोलायला शिक’

  आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात,

  ‘खाली बस आणि जरा ऐकायला शिक’
 • खोटं बोलायला पण काही लिमिट असते….

  ८) काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,

  “अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..”
 • ९) आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”

  बंड्या: “लिहायला शिकवले.”

  आई: “अरे वा छान! काय लिहले?”

  बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….
 • १०) जर तुमचा भाऊ/बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील
  तर सरळ त्याच्या/तिच्या कानात जाऊन बोलायचं…
  .
  .
  .
  .
  बाबा तुझा मोबाईल चेक करताय बघा तुफान येईल तुफान …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here