राष्ट्रपती राजवटीबाबत अजित पवारांचे मोठे विधान; वाचा, काय म्हटलंय त्यांनी

सोलापूर :

महाराष्ट्रात अनेक घडामोडीनंतर भाजपचे अनेक नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. यासबंधी राज्यपालांची भेट घेतात. दरम्यान सुप्रीम कोर्टाने ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी’ करणारी याचिका फेटाळून लावली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘’महाराष्ट्रात कलम ३६५ अर्थात राष्ट्रपती राजवट  लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्रात ३६५ चा वापर करणे एवढे सोपे नाही. बहुमत असल्यानंतर कोणीही लगेच सरकार पाडू शकत नाही. त्यामुळे उगाचच अनावश्यक चर्चा करू नये’, असे म्हणत विरोधकांना सुनावले आहे.

यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सोलापुरात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रपती राजवट बाबत हे भाष्य केले. पुढे बोलताना केंद्र सरकारच्या मदतीविषयी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय पथकाने यावे आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करावा. त्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल.

यावेळी केंद्राने अद्याप ‘जीएसटी’चे ६० हजार कोटी दिले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती करोनामुळे खूप अवघड झाली असताना केंद्राकडून अद्याप ‘ जीएसटी ‘चे ६० हजार कोटी मिळालेले नाहीत. राज्याकडे कररूपाने येणारी रक्कम गोळा होत नसल्याने राज्याच्या ऐपती एवढे कर्ज काढून ६ महिने राज्याचा गाडा ओढला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here