म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झाले; चंद्रकांत पाटलांची जळजळीत टीका

मुंबई :

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांच्या काही वर्षांपूर्वी घडलेल्या    पोलीसांसह अरेरावी करण्याच्या एका प्रकरणाचा निकाल नुकताच लागला. या निकालानंतर वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर ‘यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणं गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, अशी जळजळीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ते म्हणाले की, यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here