मुलगी जन्माला येताच केंद्राकडून मिळणार 11000 रुपये; वाचा, कसा करावा अर्ज

दिल्ली :

केंद्र सरकार जनसामान्यांसाठी विविध योजना आणत असते. विशेषकरून मुलींसाठी आजवर केंद्राने अनेक योजना आणल्या तसेच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ सारखे अभियानही राबविले. आता केंद्र सरकारने स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी एक मोठे पूल उचलले आहे. मुलगी जन्माला येताच केंद्र सरकारकडून  11000 हजार रुपये दिले जाणार आहेत.    
देशामध्ये लैंगिक असमतोल वाढू लागला आहे. दर हजार पुरुषांमागे स्रियांची संख्या घटत आहे. याच पार्श्वभूमीवर लैंगिक असमानतेवर काम करणारी संघटना जेनेक्सने ही घोषणा केली आहे.

असा करा अर्ज :-

  • या योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे.
  • प्रसुतीच्या आधी पालकांनी त्यांचे नाव जेनेक्सच्या वेबसाईटवर नोंदवावे लागणार आहे.
  • यासाठी कोणतेही शुल्क किंवा अन्य स्वरुपात पैसे स्वीकारले जाणार नाहीत.
  • पालकांना www.genexchild.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

आम्ही 1.5 लाख नेटवर्क पार्टनरांसोबत मिळून या योजना तयार केली आहे. आम्हाला याचा अभिमान वाटत आहे. पुढील पिढी स्वावलंबी आणि स्वतंत्र बनविण्याच्या दिशेने हे एक छोटेसे पाऊल आहे, अशी माहिती जेनेक्सचे संस्थापक पंकज गुप्ता यांनी दिली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here