असा बनवा झटपट आणि टेस्टी पनीर पराठा; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

पनीर आणि पराठा हे दोन्ही शाकाहारी मंडळींचे आवडीचे विषय आहेत. पनीरचे विविध पदार्थ टेस्ट करणे आणि वेगेवगळ्या पदार्थांचे पराठे खाणे, हे शाकाहारी खवय्यांचे नेहमीचे काम असते. आज आम्ही आपल्याला टेस्टी ‘पनीर पराठा’ कसा बनवायचा हे सांगणार आहोत…

झटपट पनीर पराठा बनवण्यासाठी झटपट साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 200 ग्रॅम पनीर
 • 1 कांदा बारीक चिरलेला
 • 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
 • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
 • 1 टिस्पून आद्रक किसलेल
 • 1/2 टिस्पून लाल तिखट
 • 1 टिस्पून चाट मसाला
 • 1/2 टिस्पून गरम मसाला
 • चवीनुसार मीठ
 • 1 आणि 1/2 कप ग व्हाचे पीठ
 • 1/2 टिस्पून ओवा
 • 2 टेबलस्पून तेल किंवा बटर पराठा भाजण्यासाठी

साहित्य घ्या मंडळीहो… घेतले असेल तर वाट कसली बघताय…चला आम्ही सांगतोय त्या कृतीप्रमाणे बनवायला सुरुवात करा…

 1. प्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ,ओवा घाला पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
 2. नंतर एका बाऊलमध्ये पनीर किसून घ्या. कांदा,कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आद्रक,लाल तिखट, मीठ,गरम मसाला,चाट मसाला घालून मिक्स करा.
 3. पीठाचा एक छोटा गोळा घेऊन लाटून घ्या. त्यावर पनीरचे मिश्रण ठेवा. सर्व बाजूंनी एकत्र करा
 4. चपटा गोळा करून पराठा लाटून घ्यावा. तवा गरम करून पराठा टाका
 5. तेल किंवा बटर लावून पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.
 6. गरमागरम पराठा दही, हिरवी चटणी, ठेचा, टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here