असे बनवा रबड़ी गुलाब जाम; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजकाल गुलाबजाम सर्रास घरी बनवले जातात. मात्र बऱ्याचदा त्याच त्या पद्धतीच्या रेसिपी करून कंटाळले असालच. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे गुलाबजाम बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी वाचून रबड़ी गुलाबजाम नक्कीच बनवा.

रबड़ी गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…  

 1. 1/2 ली. दुध
 • 3/4 टेबल स्पुन साखर
 • 1 टेबल स्पुन मिल्क पावडर
 • 1/2 टि स्पुन वेलची पावडर
 • ४/५ काड्या केशर
 • गुलाबजामसाठी –
 • .।. कि. लो. मावा
 • 1 टि स्पुन साखर
 • 1 टेबल स्पुन आरारोट
 • 1 टि स्पुन वेलची चे दाणे (आख्खे)
 • 1 टि स्पुन बारीक रवा
 • तळण्यासाठी तुप

साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला… वाचा कृती

 1. प्रथम मावा एकजीव होईल असा छान मळुन घ्या.
 2. त्यात आरारोट व थोड़ा रवा, वेलचीचे दाणे घालुन छान मिक्स करा
 3. त्याचे छोटे २ गोळे करुन कढ़ईत तूप गरम करुन मंद आचेवर तळुन घ्या.
 4. आता एका पँन मधे दुध आटवुन घ्या.  त्यात मिल्क पावडर, केशर, विलायची, साखर (आवश्यकतेनुसास) घालुन दुध छान घट्ट करुन घ्या.
 5. थोडसं गार झाल्यावर तळलेले गुलाबजाम घाला. थोडावेळ मुरु द्या. छान थंडगार करुन रबड़ी गुलाब जाम तय्यार.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here