अॅमेझॉनचा धमाका; १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स

मुंबई :

आता सणावारांचा सिझन चालू झाला आहे. हेच लक्षात घेऊन ई़-कॉमर्स वेबसाईट विविध वस्तू उत्पादनावर एकदम तगड्या ऑफर्स देत आहेत. भारतातील सर्वात मोठी ई़-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर सुद्धा जबरदस्त सेल चालू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. स्वस्तात मस्त असा फोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. अवघ्या १० हजारापेक्षा कमी किमतीतही बेस्ट फोन्स मिळत आहेत.

कमी किंमतीत Redmi 9A पासून Samsung M01 Core पर्यंत डिव्हाईसेज खरेदी करता येवू शकतात. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के कॅशबॅक ऑफरही मिळत आहे. शाओमीचा Redmi 9A  हा फोन ६ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत मिळत आहे. लोकांच्या प्रसिद्धीस उतरलेला Redmi prime हा फोनही अवघ्या ९९९९ रुपयांत मिळत आहे.

3000mAh बॅटरी, ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला Samsung M01 Core हा फोन  केवळ ४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येतोय. Redmi 8A Dualला अॅमेझॉन सेलमध्ये ७ हजार २९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAhची बॅटरी दिली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here