म्हणून आशिष शेलार यांनी केले ठाकरेंचे कौतुक; ठाकरेंचे ‘हे’ काम महाराष्ट्राची मान उंचावणारे

मुंबई :

बाळसाहेब ठाकरे यांचे पूर्ण कुटुंब राजकारणात असले तरी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख  उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांना जैवविविधतेतील संशोधनात रस आहे. यासाठी ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कायमच भटकंती करीत असतात. नुकतीच त्यांनी माश्याची एक नवीन प्रजाती शोधून काढली. याच पार्श्वभूमीवर ‘तेजस ठाकरेंनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी “हिरण्यकेशी” प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!’, असे म्हणत भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंचे कौतुक केले आहे.

ते म्हणाले की, जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. तेजस ठाकरेंनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी “हिरण्यकेशी” प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे. यापूर्वीही शेलार यांनी एका संशोधनासाठी तेजस ठाकरेंचे मनमोकळेपणे कौतुक केले होते.

अंबोली गावमधील हिरण्यकश नदीमध्ये त्यांनी सोनेरी रंगाचे केस असणारा नवा मासा शोधला आहे. सोनेरी रंगाचे केस असणारी ही माशांची २० वी प्रजाती असून तेजस ठाकरेंनी शोध लावलेली चौथी प्रजाती आहे.तेजस ठाकरे यांनी लावलेल्या या शोधाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्रासंदर्भातील मासिकांनाही मान्यता दिली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here