अजित पवारांच्या डोकेदुखीत वाढ; ईडी करणार ‘त्या’ घोटाळ्याची चौकशी

मुंबई :

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामावर कॅगने ताशेरे ओढले. नंतर या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्यसरकारमार्फत देण्यात आले. यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या अडचणीत आलेले आहेत. अशातच सिंचन घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून होणार असल्याची माहिती मिळत आहे. या घोटाळ्याचे नाव समोर येताच अजित पवारांचे नाव आपसूकच समोर येते. पहिल्यापासून या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

२०१४ पासून सिंचन घोटाळ्याचा आधार घेत भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले जायचे. 2014च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सत्तेत आल्यास सिंचन घोटाळ्यातील दोषींना कारागृहात धाडू, असे आश्वासन दिले होते. परंतु, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सिंचन घोटाळ्याची चौकशी फारशी पुढे सरकली नव्हती.

 2019च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या सत्तानाट्यावेळी अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत शपथविधी उरकला होता. यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सहकारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजाराच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांना दिलासा मिळाला होता. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here