हसा चकटफू : शाळेतील मास्तरांचे हे विनोद वाचून आवरणार नाही हसू

 1. सर: सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला?

  रम्या: औरंगाबाद
  सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं…
  रम्या थोडा विचार करतो
  आणि म्हणतो “नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला….”
 2. शिक्षक: “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर….

  हऱ्या: इंग्रजी गेलं खड्ड्यात…. तू हात तरी लाऊन बघ ! 
 3. सर – किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?

  तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
  आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????

  . गण्या- सर , मी हसत आहे कारण
  उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त,
  तर मग हे ५ गुण आले कुठुन?
 4. शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.

  विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’

  एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.

  ‘यालाच म्हणतात आळस.’
 5. बाई: काय रे गण्या, Homework नाही केलास?

  गण्या: काल रविवार होता, Homework आठवलाच नाही.
  बाई: फेसबुकवर online व्हायला बरा टाईम मिळाला तुला.

  गण्या:(मनातल्या मनात) च्यायला का चुकून हिच्या फोटोला ‘लाईक’ केलेलं दिसतय वाटत.
 6.  मास्तर: कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?

  विद्यार्थी: सोप्प आहे सर ..,

  प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते…आणी शेवट वाइन शॉप मध्ये 
 7. शिक्षक: बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

  चिन्टु: पान नं. १७ ते ४२
 8. शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?

  .
  .
  झंप्या: कारण कुणाला कळायला नको
  कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते..
 9. एकदा एका शाळे मध्ये गणिताचे मास्तर आणि
  इतिहासाचे मास्तर यांचे काही करणा मुळे भांडण होते.

  इतिहासाचे मास्तर म्हणतात मी तुज्या अंगावर औरंगजेबाचे सैन्य घालीन.

  तर गणिताचे मास्तर म्हणतात की मी तुला आणि त्या औरंगजेबाच्या सैन्याला
  कंसा मध्ये टाकून शून्याने गुणाकार करेन.
 10. शिक्षक: त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली,
  या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.

  बंड्या: गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता
  आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here