‘त्या’ भ्रष्टाचारप्रकरणी सूडबुद्धीने चौकशी नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई :

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामावर कॅगने ताशेरे ओढले. नंतर या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सरकारमार्फत देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘फडणवीस सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सूडबुद्दीने किंवा मुद्दाम लावण्यात आलेली नाही. कॅगच्या अहवालावरून या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येत आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या अहवालात जलयुक्त शिवार योजनेबाबत नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

जलयुक्त शिवार योजने संदर्भातील कॅगचा अहवाल कुणाच्या काळात आला, कारण नसताना या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण खाते ज्यांच्याकडे होते त्यांनीच विधान परिषदेत या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते. तसे सूतोवाच त्यांनी केले होते, असेही पुढे बोलताना पवार यांनी स्पष्ट केले.

संपादन : विनोकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here