म्हणून ट्विटरने दिला ट्रम्प तात्यांना दणका; पहा काय केलीय कारवाई

लोकशाही व्यवस्थेत सर्वव्यापी अशा सत्ताधीशालाही नियमांची पायमल्ली करता येत नाही. त्यासाठी त्यांना नियम पाळून सगळे काही करावे लागते. त्याच विचारांशी बांधिलकी ठेऊन ट्विटर या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे काम चालते. फेसबुकवर काही सरकारांना जास्त संधी मिळत असतानाच समान संधी आणि फेक न्यूज याबाबतीत काम कसी करावे याचा वस्तुपाठ ट्विटरने अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यावर कारवाई करून दाखवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या @TeamTrump या ट्विटरवर सध्या ट्रम्प यांचे महान कार्य आणि विरोधकांवर बेछूट आरोप यांची सरबत्ती चालू आहे. त्यामध्ये जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडनच्या युक्रेनमधील व्यवसायाबद्दल माहितीबद्दल देणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला होता. व्हिडीओसोबत ‘जो बायडन खोटे आहेत आणि ते कित्येक वर्षापासून देशाला धोका देत आहेत’ असे कॅप्शन लिहिलेले होते. तसेच टीम ट्रम्पकडून संबंधित व्हिडीओ पहिल्यांदा डिलीट करण्यात आल्यावर दुसऱ्या वेळी ट्विट करताना ‘हा व्हिडीओ आम्ही पुन्हा पोस्ट करत आहोत जो ट्विटर तुम्हाला दाखवू इच्छित नाही’, असेही कॅप्शन दिले होते.

बायडेन यांच्या मुलाला लक्ष्य करणाऱ्या या व्हिडिओच्या मदतीने मतदारांचे सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा ट्रम्प तात्यांचा प्रयत्न आहे. असे तात्या सगळ्याचा देशात कसे उच्छाद घालत आहेत त्याचेच हे उदाहरण आहे. अमेरिका या श्रीमंत देशाची वाट लावण्यासाठी जोराने प्रयत्न असलेल्या ट्रम्प यांच्या हातातून निवडणूक जाणार असल्याचे अनेक सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याने आता त्यांनी प्रचाराला वेगळे रूप दिले आहे.

मागील निवडणुकीत असाच विजयाचा फॉर्म्युला कामी असल्याने आताही ट्रम्प तात्यांनी तेच हत्यार उपसले आहे. अशा पद्धतीने अमेरिकन निवडणूक आता खऱ्या अर्थाने भारतीय किंवा पाकिस्तानी पातळीवर येऊन ठेपली आहे. आता तो देशही असाच पाकिस्तानसारखा खालच्या पातळीवर येऊ नये म्हणजे मिळवली.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here