म्हणून अमित शाह यांना बसलाय 4 कोटींचा फटका; पहा किती आहे त्यांच्यावर कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत गुहामंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत तब्बल 4 कोटी रुपयांची घट झालेली आहे. देशातील शेअर बाजारात त्यांनी घेतलेले शेअर पडल्याने त्यांना हा मोठा फटका बसला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीत ३६ लाखांची वाढ झालेली आहे. सध्या त्यांच्याकडे 31,450 रुपये हातात असून त्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये 3,38,000 रुपये शिल्लक आहे. गुजरातमधील गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांची 1 कोटी 60 लाख 28 हजार रुपये इतकी एफडी आहे. तर, पोस्ट ऑफिसमध्ये बचत योजनेअंतर्गत 8 लाख 43 हजार रुपये आहेत. एलआयसी कंपनीच्या जीवन विमा योजनेत त्यांनी 1,50,957 रुपये आणि टॅक्स फ्री बॉंड 20,000 रुपये किमतीचे आहेत.

तर, शाह यांच्याकडे वडिलोपार्जित आणि इतर अशी नावावर असलेली संपत्ती 13 कोटी 5 लाख इतकी आहे. 2019 मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती 17 कोटी 9 लाख होती. शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली असून त्यांच्यावर 15 लाख 70 हजारांचे कर्जही आहे. शाह यांच्याकडे बँक खात्यात 1 कोटी 4 हजार रुपये आहेत. त्यांच्या हाती आता 15,814 रुपये असून फिक्स्ड डिपॉजिट ही 2,79,000 इतकी आहे आणि त्यांनी काढलेल्या जीवन विमा आणि पेन्शन योजनेची किंमत ही 13,47,000 इतकी आहे. त्यांना वडिलोपार्जित मिळालेली संपत्ती ही 12 कोटी रुपये इतकी आहे.

www.pmindia.gov.in या वेबसाईटवर केंद्रीय मंत्रिमंडळात असेलेल्या सर्व मंत्र्यांची नावावर असलेली संपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती ही 30 जूनपर्यंतची आहे तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांची संपत्ती ही 31 मार्च 2020 पर्यंतची आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here