मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; पहा नेमके काय म्हटलेय कॉंग्रेसने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना उध्वस्त केले. शेतकरी विरोधी काळे कायदे करून अख्खा देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. बाजार समित्यांना धोक्यात आणत शेतकऱ्यांची विक्री व्यवस्था मोडून काढण्याचे काम सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यव्यापी वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीमध्ये केली. 

प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खा. राजीव सातव, राष्ट्रीय सचिव वामशी रेड्डी, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे हे उत्तर महाराष्ट्र विभागातून संगमनेर मधून यात सहभागी झाले होते.  

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसच्या लालटकी कार्यालयामधून या डिजिटल रॅलीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. 

यावेळी ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अनंतराव गारदे, रियाज शेख, सय्यद खलील, शंकर आव्हाड, अमित भांड, विशाल कळमकर, प्रमोद अबुज, अनिस चुडीवाला, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, चिरंजीव गाढवे, रॉबिन साळवे, संजय भिंगारदिवे, योगेश काळे,  इंटक काँग्रेसचे हनीफभाई शेख, सुरेश सोरटे, चेतन रोहोकले, अनिल घाडगे आदि उपस्थित होते. 

तर, शहर जिल्हा काँग्रेसचे मुबीन शेख, अन्वर सय्यद, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, क्रीडा विभागाचे प्रवीणदादा गीते, स्वप्नील पाठक आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी नगर शहराच्या विविध प्रभागांमधून या डिजिटल रॅलीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते.  

संगमनेर (नाशिक विभाग), कोल्हापूर (पुणे विभाग), अमरावती (अमरावती विभाग), नागपूर (नागपूर विभाग), औरंगाबाद (मराठवाडा विभाग) राज्याच्या या वेगवेगळ्या विभागातून काँग्रेस पक्षाचे मंत्री आमदार, खासदार जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

अहमदनगर जिल्ह्यात ६५० पेक्षा जास्त ठिकाणांहून कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. तर राज्यात १०,००० पेक्षा जास्त गावांमधून डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here