‘त्यांची’ बदनामी दु:खदायक; पहा मुख्यमंत्र्यांनी नेमके असे का म्हटलेय ते

मुंबई :

सध्या केंद्रातील सत्तेत असलेल्या नेत्यांच्या पाठींब्याने सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांनी आणि काही हिंदी-इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी बॉलीवूडला बदनामी करण्याचे ठरवले आहे. शेती, रोजगारी, अर्थव्यवस्था आणि मजुरांचे प्रश्न यावर काहीही भाष्य न करणाऱ्या त्या चॅनेलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रेसनोटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने ठाकरे यांनी काय म्हटले ते दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत.

अशा पद्धतीने ठाकरे यांनी या मनोरंजनासाठी महत्वाचे काम करणाऱ्या इंडस्ट्रीला सरकारचा पाठींबा असल्याचा संदेश दिला आहे. आता त्यावर भाजप नेते आणि कंगना यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here