कांदा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे; खोकल्यापासून ते हृदयरोगापर्यंत, अनेक आजारांवर उपयोगी

कांदा आपण दैनंदिन जीवनात खात असतो. कधी भाजीत टाकून तर कधी कच्चा. कांदा खाण्याचे फायदे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतील. फायदे माहिती असले तरी एखाद-दोन  माहिती असतील कारण कांदा खाताना आपण फक्त त्याच्या टेस्टचा विचार करत असतो. कांदा किती गुणकारी आहे हे आपल्याला माहितीही नसते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत. कॅल्शिअम, अ‍ॅल्युमिन, लिग्नीन आणि अ, ब, क जीवनसत्त्व, गंधक, फॉस्फोरिक आम्ल, तंतुमय पदार्थ, स्निग्धता असे अनेक औषधी गुणधर्म कांद्यात असतात.

१)      लघवी होताना जळजळ होत असेल तर एक कांदा अर्धा लिटर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावे.

२)      तोंड व दात स्वच्छ करण्याचे काम कांदा करतो. कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडातील चिकटपणा निघून जातो.

३)      घशात कफ झाला असेल तर जिरे आणि सैंधव घालून कांद्याची कोशिंबीर करून खा.

४)      हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.

५)      कांदा व पुदिना समप्रमाणात घेऊन त्याचा रस तयार करून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे व ते मिश्रण प्यायल्यास जुलाब, उलटी, मळमळ, अपचन अशा समस्या दूर होतात.

६)      वात, पित्त आणि कफ यावर कांदा गुणकारी आहे.

७)      तिळाच्या तेलात कांद्याचा रस घालून उकळून ते तेल नियमितपणे अंघोळीपूर्वी १० मिनिटे त्वचेवर लावल्यास त्वचा सुंदर आणि नितळ होते.

८)      कांदा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

९)      कांद्याबरोबर गूळ मिसळून मुलांना खायला दिल्यास त्यांची वाढ लवकर होऊन उंची वाढते.

१०)  कांदा ठेचून त्याचा रस व पाकळी जखमेवर लावल्यास जखम त्वरित भरून निघते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here