म्हणून अमृता फडणवीस कडाडल्या; फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ?

मुंबई :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. तसेच हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले. याच पार्श्वभूमीवर राज्यात वाद सुरु आहेत. या वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर ‘आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही’, असं म्हणत शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले. यावरून संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी ‘मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ?’, असा सवाल केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला ‘बुल्डोज़र सरकार’ म्हणत डिवचले आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस :-

“वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते”

त्यानंतर विशाखा राऊत यांनी दिलेले प्रत्युत्तर :-

अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे.आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here