प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धम्माल कविता; वाचा आणि शेअर करा

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवसलग्नानंतर मात्र राहत नाही

एकदा लग्न लावून दिलं की देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,तिला भलताच चक्रम वाटायला लागतो

हळुहळू तिच्या चेह-यावरचाप्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

त्याचा तो गबाळा अवतार,तिला नीट्नेटकं राहयचं असतं

तिला चार दिवस सासूचे..तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,असं प्रत्यक्षात घडत नाही

त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,ती त्याच्या आकाशात उडत नाही.

तो गच्चीत तिला घेऊन जातो,इंद्रधनुष्यावर चालायला

ती सोबत पापड कुरड़या घेते,गच्चीत वाळत घालायला.

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरचीलखलखती शुक्राची चांदणी असते

हिच्या डोक्यात गोडा मसालाआणि वर्षभराची भाजणी असते.

आपली बायको म्हैस आहे,असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो

कोण म्हणतो लग्नाच्या गाठीदेव स्वर्गात बांधत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here